खरीप तोंडावर असतानाही शर्यतीच्या बैलांना मागणी | पुढारी

खरीप तोंडावर असतानाही शर्यतीच्या बैलांना मागणी

निमगाव दावडी, पुढारी वृत्तसेवा: चार महिन्यांपूर्वी बैलगाडा शर्यतीवरील बंदी काही अटी घालून हटविण्यात आली. त्यामुळे गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा उत्साहात सुरू झाल्या असताना बैलगाडा शर्यतीदेखील सुरू झाल्या आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला तरी अघाप बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात सुरू आहेत. त्यामुळे पळणार्‍या वासरांना व वेगवान बैलांना हेरून त्यांची खरेदी-विक्री अद्यापही
सुरू आहे.

अनेक बैलगाडामालक वेगवान धावणारे बैल व वासरांची खरेदी करून त्यांचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात. दुसर्‍या जिल्ह्यांतून, तालुक्यांतून बैलगाडामालक गोठ्यांवर येऊन बैलांचे, वासरांचे वय, तब्येत, घाटांतील वेग इत्यादी गोष्टी पाहून टेम्पो करून बैल खरेदी करतात. बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून लहान-मोठे व्यवसाय तेजीत आले आहेत. मुख्यत: घाटातील अल्हासर (निवेदक) यांना सुगीचे दिवस आले आहेत तसेच वाहतूक, हॉटेल व्यावसाय, वाजंत्री यांची चलती झाली आहे.

खेड तालुक्यातील खेड घाट, निमगाव, बहिरवाडी, पाईट, चाकण, तिन्हेवाडी, दावडी, पूर व इतर गावांनी बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणांत दुचाकीसह रोख बक्षिसे व इतर बक्षिसांची खैरात केली आहे. बैलगाडामालक बैलांची चांगल्या प्रकारे देखभाल, दवाखाना, चारा, इतर पोषक आहार, स्वच्छ पाणी, वेळेवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ, माश्या व डास चावू नये म्हणून मोठमोठे पंखे गोठ्यात लावले जात आहेत.

बैलगाडा बैल व वासरे पाळणे, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली, तरच व बैलांची अचूक निवड महत्त्वाची असते तसेच बैल घाटाचा राजा किताब पटकावितात.
– चेतन सांडभोर, बैलगाडामालक, सांडभोरवाडी

हेही वाचा 

बदलत्या हवामानामुळे केसरचे उत्पादन घटले

कवठे येमाई येथे नेपाळी तरुणाची आत्महत्या

नाशिक : बसप्रवासात वृद्देकडील 12 तोळे सोने चोरीला

 

Back to top button