फोटो, व्हिडिओ काढत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत | पुढारी

फोटो, व्हिडिओ काढत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत

बारामती, पुढारी वृत्तसेवा: मोरगाव (ता. बारामती) येथील अल्पवयीन मुलीला शाळेतून जेजुरीतील लॉजवर नेत तिचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी प्रदीप बाळासो शिंदे (रा. तरडोली, ता. बारामती) या आरोपीला अटक केली.

पीडीत मुलीच्या कुटुंबियानी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शिंदे याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ११ जून ला ही घटना घडली.

शिंदे याने ही मुलगी मोरगावातील विद्यालयात गेली असताना तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जेजुरी येथील एका लॉजवर नेले. तेथे तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर तिच्याशी बळजबरीन शारिरिक संबध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास फोटो व व्हिडिओ सर्वांना पाठवीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

राऊत साहेब तुमचं चुकलंच, मी गद्दारी कशी केली : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा सवाल

हडपसर टर्मिनलवर रेल्वे गाड्यांसाठी ‘कारशेड’; रेल्वे वसाहत आणि आरपीएफ कार्यालय हटविणार

Ratnagiri : चक्क पर्यटकांनीच लुटले रिक्षाचालकाला; एक लाखांचा ऐवज केला लंपास

 

Back to top button