वाडाच्या बाजारपेठेत रानमेवा दाखल, यंदा उत्तम बाजारभाव; आदिवासींचा होतोय मोठा फायदा | पुढारी

वाडाच्या बाजारपेठेत रानमेवा दाखल, यंदा उत्तम बाजारभाव; आदिवासींचा होतोय मोठा फायदा

वाडा, पुढारी वृत्तसेवा: वाडा (ता.खेड) बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर रानमेव्याची आवक झाली आहे. रायवळ आंबे, करवंद, आवळे, जांभळे, फणस यांची आवक वाढल्याने अनेकांना रोजगार मिळाला आहे. वाडा एक मोठी बाजारपेठ असून पश्चिम भागातील अनेक लोक सध्या रानमेवा विक्रीस आणत आहेत.

रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी पुणे, मुंबई येथील ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असून आर्थिक उलाढाल वाढली आहे. आदिवासी व दुर्गम भागातील अनेक कुटुंबे मे महिन्याच्या अखेरीस जंगलातील परिपक्व रानफळे शहरी भागात विक्री करून उदरनिर्वाह चालवत असतात. विशेषत: जांभळाला किलोला दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यंदा कमी उत्पादनामुळे येथील आदिवासींचे अर्थचक्र बिघडले आहे व खवय्यांचीही अतृप्ती झाली आहे. मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीमुळे तसेच एप्रिल व मे महिन्यात उर्वरित जंगलात वणवे लागल्याने रानफळे देणार्‍या झाडांची संख्या घटली आहे. याचा परिणाम रानफळांच्या उत्पादनावर झाला आहे.

जुन्नर: मीना कालव्याची पोटचारी दुरुस्तीची मागणी

रानफळे देणारी झाडे ही आकाराने लहान व उंचीने कमी असल्याने त्यांचा वणव्यामध्ये अधिक बळी जातो. यंदाचा कडक उन्हाळा, हवामानात वारंवार होणार्‍या बदलामुळे यंदा करवंदे, जांभळे, रायवळ आंबे, फणस यांचे उत्पादन 70 ते 80 टक्के घटले आहे. उशिराने जी काही अल्प प्रमाणात रानफळे झाडावर लागली आहेत, ती बदलत्या वातावरणामुळे अजूनही परिपक्व झालेली नाहीत.

हेही वाचा:

नारायणगाव सोसायटीचे सव्वातेरा कोटींचे पीककर्ज वाटप; नियमित कर्ज भरणार्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रस्ताव

बारामती: शासकीय महिला रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना शिविगाळ, दमदाटी

बारामती: दुकानात साबण घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत लैंगिक अत्याचार

Back to top button