

बारामती, पुढारी वृत्तसेवा: दुकानात साबण घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने समाज मंदिरात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे घडला. याप्रकरणी अभिमन्यू भारत लांडगे याच्या विरोधात तालुका पोलिसांनी बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
पीडितेच्या आईने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुक्रवारी १० जून रोजी सकाळी सिद्धेश्वर निंबोडीतील समाज मंदिरात ही घटना घडली. फिर्य़ादीत नमूद केल्यानुसार, १५ वर्षे ७ महिने वयाची अल्पवयीन पीडिता दुकानात साबण आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तेथे येत तिच्या डाव्या हाताला धरून तु माझ्याबरोबर समाज मंदिरात चल, तु जर आरडाओरडा केला तर मी तुला मारून टाकेन अशी धमकी देत तिला समाजमंदिरात ओढत नेले. तेथील दरवाजा पुढे ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आता गुपचुप घरी जा, कोणाला काही सांगू नको, नाही तर तुला जीवंत ठेवणार नाही, असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल घुगे तपास करत आहेत.