शिवसेनेकडून वडिलांचे खच्चीकरण : अतुल सावे | पुढारी

शिवसेनेकडून वडिलांचे खच्चीकरण : अतुल सावे

पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगाबाद येथे झालेल्या विराट सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह बाबरी मशीद पाडायला गेले होते की नाही ते सांगावे, असा सवाल करत भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा घणाघात केला होता. यावर आमदार अतुल सावे यांनी आज प्रतिक्रिया दिली. शिवसेनेकडून वडिलांचे खच्चीकरण केले होते, असा आरोप करत वडिलांना लोकसभेच तिकीट का दिलं नाही? असा प्रतिसवालदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या विराट सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. आमच्या हिदूत्वाचे मोजमाप घेऊ नका. ह्रदयात राम अन् हाताला काम, असे आमचे हिेंदुत्व असल्याचे भाजपला ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार अतुल सावे यांना प्रश्न केला होता कि, त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह बाबरी मशीद पाडायला गेले होते की नाही. यावर सावे यांनी आज प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले कि, वडील कारसेवक म्हणून आयोध्येला गेले होते. तेथून आल्यानंतर प्रखर हिंदुत्व मांडत होते. पण शिवसेनेच्या नेत्यांना ते आवडलं नाही, म्हणून त्यांनी त्यांचे खच्चीकरण केले होते. तसेच वडिलांना शिवसेनेने लोकसभेचे तिकिट का दिले नाही असा प्रतिसवाल त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button