पुणे, कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : बारावीत नापास झाल्याच्या नैराश्यातून पुण्यातील कोथरूड येथील तरूणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार आज (दि.८) दुपारी घडला. निखिल लक्ष्मण नाईक (वय १९, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, क्रिकेटची आवड असलेल्या निखिलने बॉडी बनवण्यासाठी जीम सुरू केली होती. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे.
निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खुपच उत्सुक होता. आज दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या ऑनलाईन निकालात नापास झाल्याचे समजताच तो निराश झाला. त्यानंतर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून त्यांने उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, उडी मारताना तो खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे (वय 30) यांच्या अंगावर पडला. यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. निखिलच्या जाण्यामुळे श्रावणधारा वसाहतीमध्ये शोककळा पसरली. महिलांना यावेळी आश्रू अनावर झाले. सुरवातीला झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहिली आहे. त्याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून त्याने निखीलने उडी मारून आत्महत्या केली. क्रिकेटप्रेमी असलेल्या निखीलच्या अचानक जाण्याने त्याचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
कोथरूड परिसरात श्रावणधारा वसाहत आहे. दुपारी 12 वी चा ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर त्यात नापास झाल्याचे निखिलला समजले. त्यातूनच आलेल्या नैराश्यातून त्याने सहाव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या घरची परिस्थिती बिकट आहे.
– महेंद्र जगताप, वरिष्ठ निरीक्षक, कोथरूड पोलीस ठाणे
हेही वाचलंत का ?