माझ्या बॉयफ्रेंडसोबत तू का फिरतेस? तरुणींनी भररस्त्यात मुलीला तुडवले | पुढारी

माझ्या बॉयफ्रेंडसोबत तू का फिरतेस? तरुणींनी भररस्त्यात मुलीला तुडवले

विक्रोळी : पुढारी ऑनलाईन  : तो माझा बॉयफ्रेंड होता. तू मध्ये का पडलीस? त्याच्यासोबत का फिरतेस, असे सवाल करीत एक तरुणी मैत्रिणीसह दुसर्‍या तरुणीवर तुटून पडली आणि विक्रोळी पूर्व येथील पूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर झालेल्या या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडीओमध्ये एका मुलीला दोन मुली लाथा-बुक्क्यांनी मारत आणि प्रसंगी तुडवत असताना दिसतात. तू माझ्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध कशी ठेवतेस म्हणून दुसरी मुलगी तिला प्रश्न विचारत बेदम मारहाण करीत आहे,सोबत तिची मैत्रीणही तिला मारहाण करण्यास मदत करत असून, दोघी मैत्रिणी मार खाणार्‍या मुलीला अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करीत आहेत.

विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही मुली टागोर नगरमधील रहिवासी आहेत आणि मौत्रिणीच आहेत. 12 ऑगस्ट रोजी दुपारी सर्व्हिस रोडवर हा हाणामारीचा प्रकार घडला.

तिन्ही मुलींची चौकशी सुरू आहे. तर यापूर्वीही याच मुलींचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या व्हिडीओमागील सत्य चौकशीनंतरच समोर येऊ शकते.मात्र या मुलींची फ्री स्टाईल हाणामारी पाहून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.

Back to top button