पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटनांत वाढ | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटनांत वाढ

पिंपरी : शहरात विविध ठिकाणी वाहन चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत भोसरी येथील अक्षय मोतीलाल धर्मावत (32) यांची चारचाकी गाडी क्र. (एमएच 14 ईवाय 4966) चोरीला गेली. ही घटना शुक्रवारी 3 जून रोजी रात्री भोसरी येथे घडली. वाहन चोरीप्रकरणी धर्मावत यांनी भोसरी पोलिस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार दिली आहे.

दुसर्‍या घटनेत संभाजी गोपाळ यादव (39, रा. भक्ति-शक्ति निवास, चिखली) यांच्या मयत मावशीच्या नावावर असलेली चारचाकी गाडी क्र. (एमएच 14 एचडी 4020) राहत्या घरासमोरून (18 एप्रिल) रोजी चोरीला गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मावशीच्या घरासमोर पार्क केलेली चारचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. फिर्यादीने वाहन चोरीची तक्रार चिखली पोलिस ठाण्यात दिली आहे.

बीड : केजच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर तहसील कार्यालयात कोयत्याने हल्ला, गंभीर जखमी

भोसरी येथील शिवपूजन ब्रिजलाल गुप्ता (29 रा. भोसरीगाव) यांची दुचाकी क्र. (एमएच 14 एफवाय 7176) काळ्या रंगाची दुचाकी शुक्रवारी घराच्या दारासमोरून चोरीला गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. शुक्रवारी रात्रीच्यावेळी दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. निगडी येथील युमनानगर मधून फि र्यादी किरण गुलाबसिंग परदेशी (वय 52 रा. यमुनानगर, निगडी) यांची चारचाकी क्र. (एमएच 14 सीसी 3830) शनिवारी 4 जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने चोरून नेली.

हुंड्यासाठी छळ प्रकरणात कोर्टाची मोठी टिप्पणी; घरातील प्रत्येक व्यक्ती आरोपी होऊ शकत नाही!

आकुर्डीमधून फि र्यादी बुधराम हरीहरप्रसाद सोनी (52 रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांची दुचाकी गाडी क्र. (एमएच 14 जीव्ही 4587) शुक्रवारी 3 जून रोजी चोरीला गेली. फिर्यादी यांची दारात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. फिर्यादीने निगडी पोलिस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार दिली आहे.

Back to top button