बीड : केजच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर तहसील कार्यालयात कोयत्याने हल्ला, गंभीर जखमी

बीड : केजच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर तहसील कार्यालयात कोयत्याने हल्ला, गंभीर जखमी
Published on
Updated on

केज : गौतम बचुटे; केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर आणि डोक्यात वार केले आहे. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या असून नायब तहसीलदार आशा वाघ यांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. ६ जून २०२२ सोमवार रोजी सकाळी ११:३० वाजता केज येथे महसूल विभागाच्या कार्यरत नायब तहसीलदार आशा वाघ आणि त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यांच्यात आपसात शेतीच्या कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. या दरम्यान सकाळी ११:३० वाजता मधुकर वाघ (वय ४५, रा. दोनडिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने केज तहसील कार्यालयात येऊन आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने आशा वाघ घाबरल्या आणि त्या जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात गेल्या. तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, आशा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथे हलविले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news