हार्वेस्टर योजनेसाठी राज्य सरकार प्रयत्नशील : आरोग्यमंत्री टोपे | पुढारी

हार्वेस्टर योजनेसाठी राज्य सरकार प्रयत्नशील : आरोग्यमंत्री टोपे

पुणे : ‘चालूवर्षीच्या हंगामात शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर झाला असून, मराठवाड्यातील कारखाने अद्यापही सुरूच आहेत. पुढील वर्षीही ऊस लागवड वाढण्याची अपेक्षा असून, वेळेत ऊसतोडीसाठी हार्वेस्टर अनुदान योजना राबविण्यास राज्य सरकार प्रयत्नशील राहील, ’

अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हीएसआय येथील राज्यस्तरीय साखर परिषदेतील चर्चासत्रात दिली. 15 जूनपर्यंत मराठवाड्यातील कारखाने सुरू राहतील.

40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात ऊसतोडणी मजूर काम करू शकत नाहीत. त्यामुळे वेळेत ऊस गाळपासाठी हार्वेस्टरची गरज असून, त्यासाठी योजना आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

लाल महालात दीपोत्सव उत्साहात; छत्रपती शिवरायांना व राष्ट्रमाता जिजाऊंना दिव्यांनी औक्षण

मावळात विदेशी दारूसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Katrina kaif : कॅटलाही कोरोना! IIFA मध्ये न जाण्याचं कारण आलं पुढं

Back to top button