मावळात विदेशी दारूसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मावळात विदेशी दारूसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा

गोवानिर्मित विदेशी दारू साठ्यासह सुमारे 87 लाख 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे.

जयकिसन धीमाराम ढाका व सुजानाराम जियाराम बिष्णोई (दोघे रा.राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव विभागाचे निरीक्षक संजय सराफ, भरारी पथकाचे बी.एस.घुगे, एस.आर.राठोड, दीपक सुपे, स्वाती भरणे, कर्मचारी भागवत राठोड, अक्षय म्हेत्रे, राहुल जंवजाळ, रसूल काद्री, चंद्रकांत नाईक, सूरज घुले, मुकुंद पोटे, जयराम कचरा यांनी सोमाटणे फाटा बाह्यवळण ते तळेगाव टोलनाका मार्गावर सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईमध्ये गोवानिर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असणारी व्हिस्की, बिअर, व्होडका या विदेशी दारूचे 59 लाख 60 हजार 400 रुपये किमतीचे 1006 बॉक्स जप्त करण्यात आले असून एम.एच.48 ए.वाय.9434 व एम.एच.04 जे.यु.3515 हे दोन ट्रक, असा एकूण 87 लाख 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बी.एस.घुगे, दिलीप सुपे हे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news