लाल महालात दीपोत्सव उत्साहात; छत्रपती शिवरायांना व राष्ट्रमाता जिजाऊंना दिव्यांनी औक्षण | पुढारी

लाल महालात दीपोत्सव उत्साहात; छत्रपती शिवरायांना व राष्ट्रमाता जिजाऊंना दिव्यांनी औक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

संभाजी ब्रिगेड आणि राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला लाल महालात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवरायांना व राष्ट्रमाता जिजाऊंना दिव्यांनी औक्षण करण्यात आले. 12 मावळातील पवित्र नद्यांचे, तसेच श्रीक्षेत्र देहू येथून इंद्रायणीचे पवित्र जल व गडकिल्ल्यांवरील पाण्याचे जलकुंभ लाल महालात आणण्यात आले.

तसेच, किल्ले राजगड, रायरेश्वर, केंजळगड, रोहिडेश्वर, पुरंदरवरील पवित्र जलकुंभाचे पूजन करण्यात आले. तसेच, पूर्वसंध्येला दीपोत्सव आयोजित केला होता. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड चे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, मंदार बहिरट उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सचिन जोशी, अक्षय रणपिसे, नीलेश इंगवले, रोहित ढमाले यांनी केले.

शिवरायांच्या रूपाने तेजोकिरण

‘किल्ले शिवनेरीवरून एक तेजोकिरण बाहेर पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने तो तेजोकिरण महाराष्ट्र भूमीवर अवतरला,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.वासुदेवबुवा बुरसे यांनी केले. सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती या तिस-या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वासुदेवबुवा बुरसे यांचे कीर्तन झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. सिद्धार्थ कुंभोजकर (तबला), हर्षल काटदरे (ऑर्गन) यांनी साथसंगत केली.

बीड : केजच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर तहसील कार्यालयात कोयत्याने हल्ला, गंभीर जखमी

अनधिकृत बांधकामे उभी राहतातच कशी; आमदार, खासदारांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर

ऊस गाळपासाठी पुढील वर्ष भयावह; संजय खताळ यांचा इशारा

 

Back to top button