रेल्वे 7 मिनिटांत चकाचक; घोरपडीत उभारला स्वयंचलित वॉशिंग प्लांट | पुढारी

रेल्वे 7 मिनिटांत चकाचक; घोरपडीत उभारला स्वयंचलित वॉशिंग प्लांट

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रेल्वेची 24 डब्यांची गाडी अवघ्या 7 मिनिटांत चकाचक होणार आहे. पुणे रेल्वे विभागाने पर्यावरण संवर्धनासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी घोरपडी येथे रेल्वेगाड्यांकरिता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट उभारला आहे. घोरपडीतील या अत्याधुनिक प्लांटमुळे रेल्वेगाड्यांचे मोठ-मोठे डबे धुण्यासाठी वेळेची आणि पाण्याची बचत होत आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय यांत्रिक इंजिनिअर विजयसिंह दडस यांच्या नेतृत्वाखाली घोरपडी येथे या प्लांटची उभारणी करण्यात आली. रेल्वेचे डबे धुण्यासाठी लागणार्‍या पाण्याचा वापर प्रतिकोच 1500 रुपये लिटरवरून कमी होऊन 230 रुपये लिटर झाला आहे.

कोल्हे कारखान्यास उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार प्रदान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील संस्थेने केला गौरव

वॉशिंग लाइनमध्ये (पिट लाइन) रेक प्लेसिंग करताना 24 डब्यांच्या गाडीची सफाई जवळपास सात मिनिटांत पूर्ण होत आहे. यासोबतच मनुष्यबळही कमी लागत आहे. प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे गाडीचा डबा धुलाई क्षेत्रातून 5 ते 8 किमी/तास वेगाने चालवून स्वच्छ केला जातो. ज्यामुळे कर्मचारीसुद्धा सुरक्षित राहतात.

हेच काम मनुष्यबळाने केले तर ते पूर्ण होण्यास चार तास लागतात आणि पाण्याचा अपव्यय अधिक होतो. आता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटमुळे पाण्याचा वापर खूप कमी होत आहे आणि डबे धुतल्यानंतर दूषित पाणी रिसायकल करून परत उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे सुमारे 80 टक्के पाण्याचा पुनर्वापर शक्य झाला आहे.

मेट्रोनेही उभारला प्लांट

पुणे शहरातसुध्दा सार्वजनिक वाहतूक पुरविण्यासाठी मेट्रो ट्रेनची सुविधा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रोची ट्रेन सुरूही झाली आहे. खराब होणार्‍या मेट्रोच्या गाड्या धुण्यासाठी मेट्रोकडूनसुध्दा असाच प्लांट उभारण्यात आला आहे.

हेही वाचा 

हुंड्यासाठी छळ प्रकरणात कोर्टाची मोठी टिप्पणी; घरातील प्रत्येक व्यक्ती आरोपी होऊ शकत नाही!

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीसाठी पाऊल

नाशिक : कांद्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम

Back to top button