गडकरींमुळे ‘रिंगरोड’चे दोन हजार कोटी वाचणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती | पुढारी

गडकरींमुळे ‘रिंगरोड’चे दोन हजार कोटी वाचणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने पुण्यात करण्यात येणार्‍या रिंगरोडचे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतील तब्बल दोन हजार कोटी रुपये वाचणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्याच्या रिंगरोडचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एनएचआय करणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक ‘पुढारी’ ने दिले होते. यावर आज शिक्कामोर्तब झाला.

या संदर्भात बोलताना पवार म्हणाले, ”नितीन गडकरी यांच्याबरोबर माजी बैठक झाली आहे. गडकरींनी पुण्याच्या रिंगरोडचा काही भाग मार्गी लावण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील काही प्रमाणात ताण कमी होणार आहे. तब्बल दोन हजार कोटींचा फायदा राज्य सरकारचा होणार आहे.”

पैठण : धक्कादायक! पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच दोन महिलांचा खून आणि दोन आत्महत्या

पुणे-बंगळुरू रोड, पुणे-औरंगाबाद रोड एनएचआय करणार आहे. त्याच्या भोवतालचा रस्ता गडकरी करून देणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले. याचा फायदा पुण्याच्या रिंगरोडलाही होणार आहे. हा रिंगरोड बंदिस्त असणार नाही. ठिकठिकाणी या रिंगरोडला रस्ते जोडण्यात येणार आहेत.

रिंगरोडच्या भूसंपादनाचा पन्नास टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार असून, काही भागाचे कामदेखील केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. पुण्याकरिता महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंगरोडचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. या रिंगरोडचा डीपीआरदेखील तयार झाला आहे. त्याचे डिझाइन शासनाकडे पाठविण्यात आले आहे. या रस्त्याकरिता तब्बल 17 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पूर्व टप्पा आणि पश्चिम टप्पा, असा दोन पातळीवर हा रिंगरोड राहणार आहे.

हेही वाचा 

कोल्हापूर बनतेय ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’

नाशिक : बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

हिंगोली : रूखी शिवारातील कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

Back to top button