नाशिक : बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार | पुढारी

नाशिक : बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाजवळ रविवारी (दि.५) सायंकाळी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. मयूर बाळू भोसले (२५, रा. विडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर हा आपल्या दुचाकीने (क्र.एमएच १५ बीआर ११४३) मुंबई-आग्रा महामार्गावरून चालला होता. या दरम्यान के. के. वाघ महाविद्यालयासमोरील पोल क्रमांक ६४ जवळून तो द्वारका-पुणे रोडकडे यूटर्न घेत होता. त्यावेळी शिरपूर – धुळे नाशिकमार्गे पालघरला जात असलेल्या बसने (क्रमांक एमएच १३ सी यू ६९१०) मयुरला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button