पुणे ; पुढारी वृत्तसेवा
प्रेयसीला पटविल्याच्या रागातून तरुणाचा कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार वानवडीत घडला. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली असून, दुसरा पसार झाला आहे.मोसीम सलीम शेख (वय 24, रा. कैसरबाग, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, इरफान इम्तीयाज खान हा पसार झाला आहे. याघटनेत साहील गुलाब शेख हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत साहिलचा मित्र नदीम सय्यद (वय 27) यांने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान याच्या प्रेयसीबराेबर साहिलची ओळख झाली. यातून दाेघे प्रेमात पडले. त्याबाबत इरफानच्या मनात राग होता. साहील आणि त्याचा मित्र नदीम हे दोघे पहाटे साडेतीनच्या सुमारास चहा पिण्यास निघाले होते. तेव्हा गोळीबार मैदान रस्त्यावरील न्यू कमांड हॉस्पीटलच्या एक्झीट गेटच्या पुढे आल्यानतंर माेसीम व व त्याच्या मित्र इरफानने त्यांचा पाठलाग केला.साहील आणि त्याचा मित्र नदीम याला अडविले.साहीलला मारहाण करत, त्याच्यावर काेयत्याने वार केला. त्याच्या डोक्यात, खांद्यावर व बरगडीवर वार केल्याने साहिल गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर दोघेही पसार झाले. पोलीसांनी मोसीम शेख याला अटक केली असून, अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.