पुणे - बंगळूर महामार्गावर कारची कंटेनरला धडक : जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील ५ जण ठार | पुढारी

पुणे - बंगळूर महामार्गावर कारची कंटेनरला धडक : जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील ५ जण ठार

नेर्ले : पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कार व कंटनेरचा आज भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वाळवा तालुक्यातील कासेगावजवळ आज (शनिवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे (वय ३८), स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे (वय १०) विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अरिंजय हे नौदलात नोकरीस होते.

याबाबत कासेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कारमधून (एम एच १४ डी. एन. ६३३९) मृत कुटुंब पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

Back to top button