बिल्डरने तरुणावर थेट रोखले पिस्तूल; कोथरूड मधील भुसारी कॉलनीतील घटना | पुढारी

बिल्डरने तरुणावर थेट रोखले पिस्तूल; कोथरूड मधील भुसारी कॉलनीतील घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मोटारसायकलची चारचाकी गाडीला धडक लागल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून बांधकाम व्यावसायिकाने एका तरुणावर थेट पिस्तूल रोखले. एकमेकांना साईड देण्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी सागर गुलाब शिंदे (वय 26, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी गजेंद्र अशोक हगवणे (रा. किरकटवाडी, सिंहगड रोड) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उजवी भुसारी कॉलनीतील हनुमान मंदिराच्या पुढे शुक्रवारी मध्यरात्री घडली. त्यानंतर झालेल्या प्रकारातून दोघांनी परस्परांविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

रत्नागिरी : पूर्वमोसमी रुसल्यास खरीप कामांची रखडपट्टी;

फिर्यादी सागरने समोरून येणार्‍या गजेंद्रच्या मोटारीला धडक दिली. या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सागर घरासमोर आला. त्यावेळी तेथे येऊन गजेंद्रने फिर्यादीना मारहाण करत खाली पाडले. त्यांच्याकडील पिस्तूल काढून फिर्यादीच्या छातीवर बसून त्याच्या दिशेने रोखले..

दरम्यान, गजेंद्र हगवणे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सागर गुलाब शिंदे व नितीन गुलाब शिंदे (रा. उजवी भुसारी कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गजेंद्र यांच्या चारचाकीसमोर आलेल्या मोटारसायकल चालक सागर शिंदे याने साईड देण्याचे कारणावरून वाद घातला. त्यांच्या कारची पाठीमागील काच व डाव्या बाजूची पुढील काच फोडून नुकसान केले.

हेही वाचा 

तस्कराकडून आठ लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त

नाशिक : गट-गणावर जिल्ह्यात आणखी एक हरकत

शनिशिंगणापूर सेवा संस्थेची निवडणूक झाली बिनविरोध

Back to top button