यवत : पुढारी वृत्तसेवा
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडाचे विधानसभा सदस्य शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून ते स्वतः या गाडीतून प्रवास करत होते. याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून आमदार तानाजी सावंत यांचे चालक सोनबा शंकर देवकाते, आमदार तानाजी सावंत व इतर काही लोक टोयोटा कंपनीची लॅन्डक्रुझर कारगाडीमधुन उस्मानाबाद येथुन सोलापूर -पुणे महामार्गाने पुणे येथे जाणेसाठी निघाले होते.
शनिवारी रात्री वरवंड (ता.दौैंड) गांवच्या हद्दीत महामार्गाच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेतील कंन्टेनर चालकाने पाठीमागून येणा-या वाहनांना कोणताही इशारा न देता त्याची मार्गिका सोडून कंन्टेनर धोकादायकरित्या अचानक उजव्या बाजूच्या मार्गिकेवर घेतल्याने आ सावंत यांच्या कारगाडीच्या उजव्या बाजूला जोरात धडक बसून हा अपघात झाला आहे.
कंन्टेनरच्या पाठीमागील बाॅडीच्या बाहेर अंदाजे 3 फुट एक मोठी मशिनरी घेवुन जात होता. कंटेनर ला रिफलेक्टर नव्हते. अपघातात कोणीही जखमी झाले नाही परंतु आमदार सावंत यांच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले आहेे. कंन्टेनर चालकाचे नांव रोहीत देविदास वाघमोडे (रा. सोलापूर) असे असुन हा अपघात त्याच्या चुकीमुळे झाला असल्याची तक्रार आमदार तानाजी सावंत यांचे चालक यांनी दिली असून पुढील तपास यवत पोलिस करत आहेत.
हेही वाचा