पोलिसांकडून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त | पुढारी

पोलिसांकडून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अवैधरीत्या सुरू असलेला गावठी दारूअड्डा लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या वेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे दोन हजार लिटरचे रसायन नष्ट करण्यात आले. शिंदवणे येथील राठोडवस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. गावठी दारू तयार करणार्‍या मंदाराणी शाखा राठोड (52), पंखाबाई व्यंकट राठोड (52), शंकर फुलसिंग ठाकूर (34), अक्षय देविदास मुसळे (32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी केल्या आहेत. यानुसार लोणी काळभोर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान शिंदवणेतील राठोडवस्ती भागात गावठी दारू बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने येथे छापा टाकला.

त्या वेळी तुरटी व पाणी यांचे अंदाजे दोन हजार लिटर रसायन व इतर साहित्यानिशी आरोपी गावठी दारू बनवीत असल्याचे आढळले. पोलिसांनी दारू अड्डा उद्ध्वस्त करीत 21 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू महानोर, कर्मचारी नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, राजेश दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा 

पर्यावरण र्‍हासाला शासकीय यंत्रणा जबाबदार

निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती, प्रत्येक पंचायत समिती गणासाठी स्वतंत्र मंडळ अध्यक्ष व त्याची स्वतंत्र कार्यकारिणी

विद्यार्थ्यांची गुणांवरून पात्रता न बघता त्यांची क्षमता बघा: प्रा. शिंदे

Back to top button