

नगर : पुढारी वृत्तसेवा
प्रदेश काँग्रेस कमिटीचे निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेस अंतर्गत निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिनाभरात तालुका व शहर काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.
बुथ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडणुकीकरीता निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उदयपुर येथील शिबिरात ठरविल्याप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती गणासाठी स्वतंत्र मंडळ अध्यक्ष व त्याची स्वतंत्र कार्यकारिणी नेमण्यात येणार आहे. आगामी शंभर दिवसात भारत जोडो हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक तालुका काँग्रेससाठी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी म्हणून नेमणुका केल्या असल्याचे साळुंके यांनी सांगितले.
असे आहेत निरीक्षक,
श्रीरामपूर – गणपतराव सांगळे,
अकोले – प्रा. हिरालाल पगडाल
संगमनेर – मधुकरराव नवले
नेवासा – सचिन गुजर
शेवगाव – अंकुशराव कानडे
श्रीगोंदा – ज्ञानदेव वाफारे
जामखेड – कैलास शेवाळे
कर्जत – अनुराधाताई नागवडे.
नगर शहर, तालुका – माणिकराव मोरे
पाथर्डी – भैय्या वाबळे
राहाता – इंद्रभान थोरात
कोपरगाव – डॉ. एकनाथ गोंदकर
राहुरी – ज्ञानेश्वर मुरकुटे
पारनेर – जयंत वाघ
भिंगार – लताताई डांगे