कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनीतील दोघांवर गुन्हा

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनीतील दोघांवर गुन्हा

पिंपरी : पगार दिला नसल्याने कर्मचार्‍याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 1 जून रोजी बावधन, पुणे येथे घडली.
राकेश बाळू सोनवणे (34, रा. शिवमल्हार सोसायटी, भुंडेवस्ती, बावधन) असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

त्यानुसार, मिस्टर छत्री सर उर्फ सुनील कुमार, वानखडे आणि या एचआर कदम (पूर्ण नाव, पत्ते माहीत नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन अधिकार्‍यांची नावे आहेत. याबाबत मयत राकेश यांच्या पत्नी (वय 31) यांनी शुक्रवारी (दि. 3) हिंजवडी पोलिस ठाण्यात आत्महत्या प्रवृत्त केल्याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचे पती राकेश सोनवणे यांनी कंपनीत काम करूनही त्यांना पगार दिला नाही. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी 1 जून रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

आपल्या पतीच्या आत्महत्येस कंपनीतील तीन जण जबाबदार असल्याचे फिर्यादी यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक महादेव यलमार तपास करीत आहेत

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news