हॉटेलचे बिल बुडविणार्‍या ग्राहकाला अटक | पुढारी

हॉटेलचे बिल बुडविणार्‍या ग्राहकाला अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

हॉटेलमध्ये राहून दहा लाख 74 हजार रुपयांचे बिल बुडविणार्‍या ग्राहकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 5 फेब्रुवारी 2022 ते 3 जून 2022 या कालावधीमध्ये हिंजवडीतील एका हॉटेलमध्ये घडली.

यश किरण गारुडकर (21, रा. वारजे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक फ्रान्सिस डिसुफा (33, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी शुक्रवारी (दि. 3) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये येऊन रूम पाहिजे, असे म्हणून एक महिन्याकरिता दोन लाख 25 हजार रुपये ऍडव्हान्स देऊन रूम बुक केली. 22 मार्च रोजी अ‍ॅडव्हान्स दिलेले हे भाडे संपले.

त्यानंतर आरोपी यश याला हॉटेल मॅनेजमेंटने पुढील पेमेंट करायला सांगितले. मात्र, मी नंतर पेमेंट करतो, असे सांगून आरोपीने पेमेंट देण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली. तसेच, 22 मार्च 2022 ते 3 जून 2022 या कालावधीमध्ये हॉटेलमध्ये थांबून दहा लाख 74 हजार रुपयांचे पेमेंट न करता विश्वासघात केला. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा 

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पहिले वसतिगृह सुरू करण्याचे भाग्य लाभले : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

विदेशी माशांच्या आक्रमणामुळे स्थानिक 56 प्रजाती नामशेष; मुळा-मुठेतील मत्स्यजीवन होतेय र्‍हास

गल्लीबोळ चारचाकींनी फुल्ल; अनेक ठिकाणचे कोंडाळे गूल

Back to top button