आरटीईच्या 28 हजार जागा; रिक्त प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढीचा निर्णय | पुढारी

आरटीईच्या 28 हजार जागा; रिक्त प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढीचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्यापही 28 हजार 517 जागा रिक्तच आहेत.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (दि. 6 जून) प्रवेश निश्चित करता येणार आहे.

आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यातील 1 लाख 12 हजार 560 विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला.

सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्यापही 28 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिकचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा 

सोलापूर : मरणयातनेत जगणं अन् मरणानंतरही पोरकेपण

मंगळवेढा : गतवेळी सत्तांतर का घडले याचे आत्मपरिक्षण व्हावे

पुण्यात भाजपची ‘सेफ’ अस्वस्थता

Back to top button