आरक्षणातून मिळालेल्या पदांचे सोनं करा : तटकरे | पुढारी

आरक्षणातून मिळालेल्या पदांचे सोनं करा : तटकरे

तळेगाव दाभाडे : महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण मिळाले असून यातून मिळालेल्या पदांचे सोनं करून दाखवावे, असे आवाहन राज्याच्या उद्योग खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेने कडोलकर कॉलनी चौकात तयार केलेल्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’या समूह शिल्पाच्या उद्घाटनप्रसंगी तटकरे बोलत होत्या. या वेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संतोष भेगडे, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, रामनाथ वारिंगे, गणेश काकडे, सचिन घोटकुले, किशोर सातकर, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यातालुकाध्यक्ष दीपाली गराडे, सारिका शेळके, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, हेमलता खळदे, अर्चना घारे, माया भेगडे, शोभा कदम, रूपाली दाभाडे, शैलजा काळोखे, स्मिता चव्हाण, अर्चना दाभाडे आदी पदाधिकारी होते.

पोलिस पाटलांना सहकारी संस्थांमध्ये निवडणूक लढवण्याची संधी

या वेळी शिल्प घडविणारे मूर्तिकार योगेश कार्लेकर व ठेकेदार महेश काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तटकरे म्हणाल्या, की लोकप्रतिनिधी पदाची झाल्यानंतर महिलांनी लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच, आपण केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा.

ज्युबिलंट कंपनीत भिषण आग: सुदैवाने जिवीतहानी टळली

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. तर, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी तटकरे यांच्याकडे केली. संतोष भेगडे यांनी स्वागत केले. राज खांडभोर यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले. माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी आभार मानले.

Back to top button