

बारामती : पुढारी वृत्तसेवा
कायम धोकेदायक घटना घडत असलेल्या नीरा-निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत ३ मे ला रात्री उशीरा आग लागली होती. लोकवस्ती शेजारी कंपनीच्या कंपाऊंडच्याआत लोखंडी जिन्यावर सुमारे अर्धा तास ही आग लागल्याचे स्थानिकांना दिसून आले. त्यामुळे परीसरात घबराट पसरली होती. भयभीत नागरीकांनी यातूनही घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले.
नीरा (ता.पुरंदर) येथील वार्ड क्र. ६ शेजारी विविध घातक रसायनांची निर्माती असलेल्या ज्युबिलंट इनिग्रेव्हा कंपनीत कायमच अशा अपघातांच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे. नीरा वार्ड नं ६ मधील रहिवाशांना असे अपघात आता नित्याचे झाले आहेत. कंपनीच्या एका बाजूला अपघात झाल्यास स्थनिक लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना अपघातांची कल्पना देतात असे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास कंपनीच्या एका प्लँंटवर जाणाऱ्या लोखंडी जिन्यावर सुमारे अर्धातास ही आग लागल्याने स्थनिकांनी सांगितले. यात कोणतीही जिवीतहानी नाही. परंतु टांगती तलवार सतत वॉर्ड क्रमांक ६ वर असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
"कंपनीच्या एका उंच भागात आग लागली होती. रात्री मोठ्या प्रमाणात वारे वाहत असल्याने ती आग मोठी असल्याचे भासले. काही मिनिटात आग नियंत्रणात आणली गेली. यात कोणीही जखमी झाले नसून, कंपनीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. अशा घटनांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे सक्षम व आधुनिक फायर यंत्रण असल्याने लोकांनी घाबरु नये."
– इसाक मुजावर, पी.आर.ओ. ज्युबिलंट इनिग्रेव्हा, नीरा
हेही वाचा