कचरा करतोय ‘अन्याय’; जिल्हा न्यायालय आवारात पालापाचोळा अन् प्लास्टिक बाटल्या | पुढारी

कचरा करतोय ‘अन्याय’; जिल्हा न्यायालय आवारात पालापाचोळा अन् प्लास्टिक बाटल्या

शंकर कवडे

पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय पालापाचोळा, पाण्याच्या बाटल्या तसेच राडारोड्यामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. इमारतीवरील जाळ्यांवर पालापाचोळा साचला आहे. स्वच्छता केल्यानंतर पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने
आवारातच कचर्‍याचा डोंगर तयार झाला आहे. न्यायालय आवारातील नवीन इमारतींना सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.

न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच अन्य कचरा इमारतीच्या पहिल्या तसेच दुसर्‍या मजल्यावरून सर्रास टाकण्यात येतो. त्यामुळे या जाळ्यांवर बाटल्यांचा खच पडला आहे. याखेरीज आवारातील झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे जाळ्या खाली लोंबू लागल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांची स्वच्छता न केल्याने इमारती विद्रूप होत आहेत.

कराड पंचायत समितीवर दक्षिणचा पगडा

याखेरीज, न्यायालयाच्या आवारातील पालापाचोळ्याची विल्हेवाट न लावता त्याचे ढीग लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या मागे वाळलेल्या पालापालोळ्याचा मोठा डोंगर तयार होऊ लागला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळलेला पालापाचोळा असून याठिकाणी आग लागल्यास त्याची मोठी झळ न्यायालयाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, पाऊस झाल्यास हा पालापाचोळा सडण्याची शक्यता असून दुर्गंधी वाढण्याची शक्यता आहे.

पन्नासहून अधिक कचराकुंड्या धूळ खात

न्यायालय परिसरातील स्वच्छता वाढावी,
यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून क्लीन सिटी इनिशिएटिव्हअंतर्गत 110 कचर्‍याकुंड्या न्यायालयाला देण्यात आल्या. त्या विविध ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित कचराकुंड्या या रेल्वे कॅण्टीनच्या मागील बाजूस धूळ खात पडून आहेत. न्यायालयाच्या स्वच्छतेसाठी दोन क्लीनिंग मशिन व त्यासाठी दोन कर्मचारी देण्यात आले आहेत. या दोन्ही मशिनद्वारे दिवसभर न्यायालयातील स्वच्छता करण्यात येत होती. मात्र, तीही दिसेनाशी झाली आहेत.

हेही वाचा 

कोल्हापूरच्या 2 मल्लांमध्ये ‘कुस्ती’ अटळ; राज्यसभा बिनविरोधचा ‘मविआ’चा प्रस्ताव भाजपने फेटाळला

आपत्तीकाळात प्रशासनाने सतर्क रहावे : ना. शंभूराज देसाई

होय आंबाच ! पण दीड किलोचा अन् पाऊण फुटाचा! वाचा सविस्तर

Back to top button