मावळात 1 गट, 2 गणांची वाढ; चांदखेड-काले गटाचे नाव शाबूत | पुढारी

मावळात 1 गट, 2 गणांची वाढ; चांदखेड-काले गटाचे नाव शाबूत

वडगाव मावळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेमध्ये मावळ तालुक्यात अपेक्षेप्रमाणे एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची संख्या वाढली असून पूर्वीच्या सर्वच गट व गणांची रचना बदलली आहे. तर, फक्त चांदखेड-काले हा गट वगळता इतर सर्व गटांची नावेही बदलली आहेत.

जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील गट व गणांची प्रभाग रचना जाहीर केली. जिल्हाधिकार्‍यांनी गट व गणांची रचनेचे काम सुरू केल्यापासून मावळात एक गट व दोन गण वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी दिल्यानंतर ही शक्यता सत्यात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आज जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेत अपेक्षेप्रमाणे मावळात 1 गट व 2 गण वाढले आहेत.

महसूल लाखोंचा, तरीही सुविधांचा अभाव; पिंपरीमधील दस्त नोंदणी कार्यालयातील चित्र

त्यामुळे पूर्वीच्या गट-गणमधून वडगाव हे मोठ्या लोकसंख्येचे शहर वगळले असले तरी तालुक्यात गट व गणांची संख्या वाढल्याने एक जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्यांची वाढ होणार आहे. परिणामी मावळातून आता 6 जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधित्व करणार आहेत. तर, मावळ पंचायत समितीमध्ये आता 12 सदस्य असणार आहेत.

गट व गणांची रचना पुढीलप्रमाणे

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गट : टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण : सावळा, माळेगाव बु, माळेगाव खु, पिंपरी अमा, इंगळुन, कुणे, अनसुटे, कशाळ, किवळे, भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आंबळे, शिरे, मंगरूळ, टाकवे बु, फळणे, बेळज, कोंडीवडे अमा. नाणे पंचायत समिती गण : खांड, कुसुर, साई, पारवडी, नाणोली नामा, घोणशेत, वाउंड, कचरेवाडी, डाहुली, वहाणगाव, कांब्रे अमा, बोरवली, कुसवली, नागाथली, वडेश्वर, माऊ, करंजगाव, ब्राम्हणवाडी, पाले नामा, मोरमारेवाडी, उकसान, शिरदे, सोमवडी, थोराण, राकसवाडी, जांभवली, गोवित्री, भाजगाव, वळवंती, वडवली, कांब्रे नामा, कोंडीवडे नामा, नाणे.

खडकाळे-वराळे गट : वराळे पंचायत समिती गण : नाणोली तर्फे चाकण, आंबी, राजपुरी, आकुर्डी, वराळे, जांभूळ, सांगवी, कान्हे, नायगाव. खडकाळे पंचायत समिती गण : खडकाळे, खामशेत, कुसगाव खु, चिखलसे, अहिरवडे, साते, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी.
कुरवंडे-कार्ला गट : कुरवंडे पंचायत समिती गण : कुरवंडे, उदेवादी, कुणे नामा, वरसोली, पांगळोली, वाकसई, देवघर, करंडोली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटने, टाकवे खु, सांगिसे, वेल्हेवळी, बुधवडी, खांडशी, नसावे. कार्ला पंचायत समिती गण : डोंगरगाव, औंढे खु, औंढोली, देवले, मळवली, सदापुर, पाटण, बोरज, भाजे, कार्ला, ताजे, पिंपळोली, पाथरगाव, मुंढावरे, वडीवळे, वळक.

पुणे- मुंबई महामार्गावर प्रवाशांना लुटणार्‍या जोडगोळीला अटक; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

कुसगाव बु-सोमाटणे गट : कुसगाव बु पंचायत समिती गण : कुसगाव बु, आपटी, गेव्हंडे आपटी, दुधीवरे, आतवण, लोहगड, महागाव, धालेवाडी, मालेवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, आंबेगाव, माजगाव, शिंदगाव, पानसोली, पाले पमा. सोमाटणे पंचायत समिती गण : कडधे, करूंज, बेडसे, बौर, ब्राम्हणवाडी, शिवणे, सडवली, ओझर्डे, उर्स, आढे, परंदवडी, सोमाटणे.

चांदखेड-काले गट : काले पंचायत समिती गण : थुगाव, आर्डव, कोथुर्णे, मळवंडी ठुले, येलघोल, धनगव्हाण, मळवंडी पमा, काले, येळसे, केवरे, चावसर, तुंग, मोरवे, शेवती, कोळेचाफेसर, शिलिंब, वाघेश्वर, कादव, अजीवली, जवण, ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, तिकोना, वारू, ब्राम्हनोली, शिवली, भडवली. चांदखेड पंचायत समिती गण : डोणे, आढले बु, आढले खु, ओवळे, दिवड, पुसाणे, पाचाणे, चांदखेड, कुसगाव पमा, बेबडओहोळ, पिंपळखूटे. इंदुरी-तळेगाव ग्रामीण गट : इंदुरी पंचायत समिती गण : सुदुंबरे, सुदवडी, इंदुरी, जांबवडे, नवलाख उंबरे, जाधववाडी, बधलवाडी, मिंडेवाडी. तळेगाव ग्रामीण पंचायत समिती गण : माळवाडी, तळेगाव ग्रामीण, गहूंजे, शिरगाव, गोडुंब्रे, धामणे, साळुंब्रे, दारूंब्रे, सांगावडे.

बोनेटमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला; जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना

इच्छुकांचा हिरमोड

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी जुन्या गट व गणांच्या रचनेप्रमाणे निवडणूक लढण्याची तयारी केली होती. संबंधित गावातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वर्षभरात लाखो रुपयांचा खर्च केला आहे. परंतु, या प्रभागरचनेनुसार बहुतांश गट व गणातील काही गावे वगळून दुसर्‍या गट, गणामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला असून खर्चही वाया गेला आहे.

Back to top button