बोनेटमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला; जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना | पुढारी

बोनेटमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला; जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना

लोणावळा : लोणावळ्यात पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारने जुन्या- मुंबई पुणे महामार्गावर खंडाळ्यात अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र ती कार पूर्णत: जाळून खाक झाली.

ही घटना गुरुवारी २ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास खंडाळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली घडली. लाल रंगाची कार क्र. (एमएच 4 जीजे 0353) गाडी घेऊन मुंबईहून लोणावळा येथे पर्यटनासाठी पाच जण निघाले होते. खोपोली येथे काही काळ थांबल्यानंतर ते खंडाळा बोर घाट चढून वर लोणावळ्याच्या दिशेने येत असताना खंडाळ्यात अचानक त्यांच्या गाडीच्या बोनेटमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला. मात्र तत्पूर्वी गाडीतील पाचही जणांना गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यश आले.

पुणे- मुंबई महामार्गावर प्रवाशांना लुटणार्‍या जोडगोळीला अटक; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

सदर घटनेची खबर मिळताच लोणावळा पोलीसचे पो.उप.निरीक्षक लतीफ मुजावर, सहायक फौजदार सदाशिव पिरगणवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या तसेच आयआरबीच्या अग्निशामक दलाने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान या कालावधीत जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Back to top button