भारतीय म्हणून अभिमान बाळगा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव | पुढारी

भारतीय म्हणून अभिमान बाळगा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘हिंदू’ किंवा ‘मुस्लिम’ म्हणून अभिमान बाळगण्याऐवजी भारतीय म्हणून अभिमान बाळगा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी केले. मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने आयोजिलेल्या एका विशेष कार्यक्रमात डॉ. आढाव बोलत होते. लेखक लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, निखिल वागळे, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, अखिल मेहता आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. आढाव आणि लक्ष्मण माने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

Video: बेधडक दादा ! “थोडं बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी उपायुक्तांना दिला सल्ला

डॉ. आढाव म्हणाले, ‘देशाची वाटचाल हळूहळू धर्मसत्तेच्या दिशेने सुरू असून, त्याचा फार मोठा धोका आहे. लक्ष्मण माने यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे चळवळ मंदावली. आज तर कायद्याचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे न्यायालयीन पातळीसह सांस्कृतिक पातळीवरही चळवळीची गरज आहे.’

पिढ्यान पिढ्या अस्पृश्यता सहन केली. पण, पद्मश्री मिळाल्यानंतर मला पुन्हा अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. माझ्यावर कायद्यानेही अन्याय केला. हा अतिशय वाईट काळ होता, अशी खंत माने यांनी व्यक्त केली. तसेच, त्यावेळी केवळ डॉ. बाबा आढाव आणि शरद पवार यांनी पाठबळ दिल्याचेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड. जयदेव गायकवाड, अरुण खोरे, निखिल वागळे यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

वाड्यावस्त्यांवरील पाण्याची वणवण थांबणार!

सरकार विना चौकशी, निकाल न लावता केवळ आरोपांवरून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवत आहे. आताचे सरकार अशा हत्यारांचा वापर करते आहे. आताचं राजकारण माणसाला जगू द्यायचं नाही, अशा पद्धतीने चालते. सध्याच्या सरकारचा घटनेपेक्षा मनुस्मृतीवर जास्त विश्वास आणि सामाजिक पातळीवर माणसाला कोर्टाच्या अगोदरच बदनाम करण्याची फॅशन वाढत आहे.

                                         – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

विमा कंपन्यांकडून मागवले प्रस्ताव; पालिकेचे निविदेसाठी जाहीर प्रकटन

महसूल लाखोंचा, तरीही सुविधांचा अभाव; पिंपरीमधील दस्त नोंदणी कार्यालयातील चित्र

नाशिक : तीन महिने उलटूनही जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त अपूर्णच

Back to top button