मसाला व्यापार्‍याकडे मागितली 40 लाखांची खंडणी | पुढारी

मसाला व्यापार्‍याकडे मागितली 40 लाखांची खंडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मसाला व्यापार्‍याकडे खंडणी स्वरुपात 40 लाखांची मागणी करत ते न दिल्यास कुटुंबियांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, 37 वर्षीय मसाला व्यापार्‍याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक जून रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी यांचा कात्रज परिसरात मसाला कारखाना आहे. बुधवारी ते कारखान्यातून घरी परत येत होते.

यावेळी, आरोपीने त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत कुटुंब सुखरूप हवे असेल तर 40 लाख रुपये रात्री कात्रज घाटात पुलाखाली आणून देण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीतर कुटुंबियांचे अपहरण करून त्यांना धार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पैठण तालुक्यातील प्रियंका बसणार कोण होणार करोडपतीच्या हॉटसीटवर!

बीड : साठ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Back to top button