माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील अन्नधान्य वितरणच्या विभागीय कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि कर्मचारी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करत महिला अधिकार्‍याचा विनयंभग केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप (रा. महात्मा गांधी सोसायटी , सहकारनगर) यांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा कार्यालयातील महिलेने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 2 जून रोजी सोमवार पेठ येथील जुनी जिल्हा परिषद येथील तिसर्‍या मजल्यावरील कार्यालयात घडला. सुभाष जगताप हे परिमंडळ ह विभागाचे दक्षता समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या भागातील नागरिकांचे रेशनकार्ड संबंधातील कागदपत्रे आणलेली होती.

यावेळी, फिर्यादी या त्यांच्या सहकारी कर्मचार्‍याशी बोलत असताना जगताप यांनी फिर्यादी यांना मोठमोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना स्पर्श करून मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून नोकरी घालविण्याची धमकी दिली. याखेरीज पाहून घेण्याची धमकी देत त्यांना कार्यालयातील अन्य सहकारी व उपस्थित नागरिकांसमोर अपमानित करून त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

सोलापूर : डॉक्टर दाम्पत्यास मारहाण प्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल

सांगली : पलूस तालुक्यात सावंतपूर नवीन जिल्हा परिषद गट, राजकीय समीकरणे बदलणार

पुणे : लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील आणखी एकाला जम्मू-काश्मीरमधून बेड्या

Back to top button