गांजा बाळगणार्‍या दोघांवर कारवाई

crime
crime
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांवर कारवाई केली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 31) हिंजवडी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी येथील कारवाईत योगेश वसंतराव पोकळे (36, रा. मारुंजी, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक अजित कुटे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश पोकळे हा सोबत गांजा बाळगत होता. दरम्यान, याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी मंगळवारी ३१ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास कासारसाई रोड मारुंजी येथे सापळा रचून योगेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा हजार 500 रुपये किमतीचा 260 ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी असा एकूण 56 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

पिंपरी येथील कारवाईत तुळसीदास गटोले कुशवाह (21, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुळसीदास कुशवाह हा मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भाटनगर येथील सरकारी दवाखान्याजवळ गांजा ओढत होता.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 12 ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य असा एकूण 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

https://youtu.be/YepUS0JEz38

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news