बिल्डरला धमकीप्रकरणी आठ महिन्यांनी गुन्हा | पुढारी

बिल्डरला धमकीप्रकरणी आठ महिन्यांनी गुन्हा

पिंपरी : जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी एकाने 500 चौरस फूट जागेची मागणी केली. ती पूर्ण न केल्यास नवीन इमारतीचे काम होऊ देणार नाही, अशी धमकी बिल्डरला दिली. याप्रकरणी आठ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना दिघी येथे घडली.

युनुस अब्बास सय्यद (50, रा. काटेवस्ती, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक बाबासाहेब परांडे (25, रा. विजयनगर, दिघी) यांनी मंगळवारी 31 मे रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 8 ऑक्टोबर 2021 ते 31 मे 2022 या कालावधीमध्ये दिघी येथे घडली.

लघुशंकेसाठी थांबलेल्या बांधकाम व्यावसायिकाला महाळुंगे येथे लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युनुस याने फिर्यादी यांच्या दिघीतील विजयनगर कॉलनी येथील जागेवर आपली गाडी बळजबरीने पार्क केली. तसेच, सदर जागेवर ऑईलचे ड्रम ठेवले. त्यामुळे जागा मालक म्हणून कुलदीप परांडे व विकास डोळस यांनी आरोपीला सदर ठिकाणी लावलेली गाडी आणि ड्रम काढण्यास सांगितले.

अन्न, औषध प्रशासनास मिळेना स्वतंत्र प्रयोगशाळा; चाचणी अहवालास महिनाभराचा कालावधी

यावेळी आरोपीने गाडी काढण्याच्या मोबदल्यात 500 चौरस फूट जागा द्यावी, अशी मागणी केली. नाहीतर फिर्यादी परांडे यांना त्यांच्या नवीन इमारतीचे काम होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक शिखरे तपास करीत आहेत.

 

Back to top button