नवीन पिढी लिखाणात दिसतच नाही; संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांचे मत

नवीन पिढी लिखाणात दिसतच नाही; संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'लिखाणात नवीन पिढी दिसतच नाही. कारण, नवीन पिढीत अभ्यास करणारी माणसे कमी आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीची उत्सुकता नाही. मराठी भाषेत तर तो खडखडाट आहे,' असे परखड मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले.
आपल्या लेखणीने मराठी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या डॉ. अशोक कामत यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रश्न : आपल्या लेखनाबद्दल सांगाल?
उत्तर : मी शाळाकाळाच्या अखेरीतच पत्रकारिता क्षेत्रात काम सुरू केले. मी विविध प्रकारचे वृत्तपत्रीय लेखन केले. कधी कुणाची साठी तर कुणाची शताब्दी…त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश…कधी सामाजिक समस्येचा ऊहापोह…कधी वसंत व्याख्यानमालेतून सादर झालेली विचारप्रवर्तक भाषणे…साहित्य संमेलनाध्यक्ष ते साहित्यिकांनी मांडलेले दृष्टिकोन. यातून पुष्कळ पुस्तके झाली असती. पण, मला ती अनेक कारणांनी करता आली नाहीत. मी स्वत:च माझी काही चांगली पुस्तके प्रकाशित केली. भेटीगाठी, भावलेली माणसं, अशी काही व्यक्तिचित्रे, सुभाषमय दिवस अशी पुस्तके मी लिहिली. मी अनेक वृत्तपत्रांसाठी लेखन केले, ते आताही सुरूच आहे.

प्रश्न : दिग्गजांचा सहवास कसा लाभला?
उत्तर : माझे भाग्य असे की, मी मराठीत जे लिखाण केले त्यातुलेनत हिंदी साहित्यातही लेखन केले आहे. हिंदीत कुठल्याही लिखाणाला मोठा कॅनव्हॉस मिळतो. असे मराठीला मिळत नाही. मी एवढी मोठी माणसं जवळून पाहिली आहेत. प्रत्येक पावलाला अशी माणसं भेटत गेली आणि मी समृद्ध होत गेलो.

प्रश्न : काय लिहायचे राहून गेले ?
उत्तर : मी वेळोवेळी लिहिले आहे, पण माझी पुस्तके करायला मला उसंतच मिळाली नाही. कारण माझ्याकडे इतके विद्यार्थी घडत होते. 54 विद्यार्थ्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी केली. मी लेखन सुरू केले त्याला 60 वर्षे झाली. माझ्या लेखनात नेहमी सातत्य राहिले. त्यात कधी खंड पडला नाही. माझा प्रवास अजूनही सुरू असून, गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी हे कार्य सुरू ठेवले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news