शहरात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम उत्साहात

शहरात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम उत्साहात
Published on
Updated on

पिंपरी : 'प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड' अभियानातंर्गत 'ग' आणि 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रविवारी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. थेरगाव, पिंपरी, रहाटणीगाव, डांगे चौक आणि एच. ए. कंपनी मैदान, संत तुकारामनगर, दापोडी, सांगवी, नवी सांगवी परिसरात प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

'ग' क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील थेरगाव, पिंपरी, रहाटणी गाव, डांगे चौक येथे रस्त्यालगत व परिसरात असलेला प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला. मोहिमेत सहायक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, प्रशासन अधिकारी राजेश ठक्कर, सहायक आरोग्य अधिकारी राजू बेद, वसंत सरोदे सहभागी झाले होते.

'ह' क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील एच. ए. कंपनी मैदान, संत तुकारामनगर, दापोडी, सांगवी, नवी सांगवी परिसरात प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला. या वेळी सहशहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त प्रशासन बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त घोडके, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, बचत गटांचे सदस्य, सामाजिक संघटनांचे सदस्य, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news