बाजारात बोंबील, बांगडेच ‘बाॅस’

बाजारात बोंबील, बांगडेच ‘बाॅस’

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या किनारपट्टीवरून बाजारात बोंबील, कोळंबी व बांगड्याची रविवारी भरपूर आवक झाली. त्याला मागणीही चांगली असल्याने दर टिकून राहिले. बाजारात सर्व प्रकारच्या मासळींची आवक -जावक कायम असून तेजीतील दर टिकून आहेत. सध्या राज्याच्या किनारपट्टीलगतच्या भागातून मासळीची आवक होत आहे. 1 जूनपासून मासेमारी बंदी असल्याने राज्यातील समुद्रकिनार्‍यावर बोटी परतू लागल्या आहेत. सध्या बाजारातील मासळीची आवक मंदावली आहे.

त्यातुलनेत मागणी चांगली असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम आहेत. पुढील आठवड्यापासून ईस्ट कोस्टवरून मासळी बाजारात दाखल होईल, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर, चिकन, मटण व गावरान अंडीचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. आवक घटल्याने इंग्लिश अंड्यांच्या भावात शेकड्यामागे 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 28) खोल समुद्रातील मासळीची 8 ते 10 टन, खाडी 100 ते 150 किलो तर नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची 8 ते 10 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1800-2200, मोठे : 1600-1700, मध्यम : 1200-1400, लहान : 900-1000, भिला : 600-700, हलवा : 800-900, सुरमई : 800-1000, रावस : 900-1200, घोळ : 700-800, करली : 400, भिंग : 300-400, पाला : 1000-1400, वाम : 900-1000, ओले बोंबील : 120-200. कोळंबी : लहान 200-280, मोठी : 360-550, जंबोप्रॉन्स : 1600-1800, किंगप्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 320-360, मांदेली : 120-160, राणीमासा : 200-240, खेकडे : 320-400, चिंबोर्या : 550-650.

खाडीची मासळी : सौंदाळे : 400-440, खापी : 360-400, नगली : 500-600, तांबोशी : 400-550, पालू : 320, लेपा : 160-200, बांगडा : 160-200, शेवटे : 200-280, पेडवी : 100-120, बेळुंजी : 160-180, तिसर्या : 240, खुबे : 120-160, तारली : 200-240. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-480, शिवडा : 200-220, खवली : 240-250, आम्ळी : 100-140, खेकडे : 240-280, वाम : 500-550. मटण : बोकडाचे 660, बोलाईचे 660, खिमा 660, कलेजी 700. चिकन 250, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 190, बोनलेस 350. अंडी : गावरान (शेकडा) 820, डझन 108, प्रतिनग 9. इंग्लिश (शेकडा) 510, डझन 66, प्रतिनग 5.50.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news