जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये एक दहशतवादी ठार | पुढारी

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये एक दहशतवादी ठार

पुलवामा (जम्मू आणि काश्मीर); पुढारी ऑनलाईन : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामातील गुंडीपुरा भागात काल रविवारी (दि.२९) सांयकाळी आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. पुलवामाच्या गुंडीपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सध्या चकमक सुरू आहे.

या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत एकूण १० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये ३ दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे तर ७ दहशतवादी लष्कर ए तोयबाचे असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान काल पुलवामाच्या गुंडीपुरा भागात एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button