देशात दिवसभरात २ हजार ७०६ कोरोनाबाधितांची भर | पुढारी

देशात दिवसभरात २ हजार ७०६ कोरोनाबाधितांची भर

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा देशात रविवारी दिवसभरात २ हजार ७०६ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, २ हजार ७० रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. आज सोमवारी देशाचा कोरोनामुक्ती दर ९८.७४%, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.९७% नोंदवण्यात आला.

देशातील ४ कोटी २६ लाख १३ हजार ४४० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १७ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ६११ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला.  महाराष्ट्रापाठोपाठ केरळ ६९,७२३, कर्नाटक ४०,१०६, तामिळनाडू ३८,०३५, दिल्ली २६,२०८, उत्तर प्रदेश २३,५१९ तसेच पश्चिम बंगालमध्ये २१ हजार २०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९३ कोटी ३१ लाख ५७ हजार ३५२ डोस लावण्यात आले आहेत. यातील ३.३८ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून ३ कोटी ४७ लाखांहून अधिक बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोसपैकी १५ कोटी ५६ लाख २ हजार २७० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८५ कोटी ७७ लाख ४०९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील २ लाख ७८ हजार २६७ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button