पुणे : आदेश पाळला नाही आणि तिने पोटगीचा हक्क गमावला | पुढारी

पुणे : आदेश पाळला नाही आणि तिने पोटगीचा हक्क गमावला

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एक महिन्याच्या आत नांदायला येण्याचा आदेश पत्नीने न पाळल्याने  पतीचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. पत्नीने सासरी परत यावे यासाठी पतीने कौटुंबिक न्यायालयामार्फत पत्नीला नोटीस पाठविली. नोटीस पाठवूनही ती सासरी तसेच न्यायालयात हजर झाली नाही. त्यावर न्यायालयाने एका महिन्याच्या आत नांदायला येण्याचा आदेश दिला.

चिंचवड गावातील नवीन फुटपाथना खोदकामाचं ग्रहण

त्यानंतरही ती न आल्याने पतीने न्यायालयात विनापोटगी घटस्फोटासाठी अर्ज केला. सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. गिरडकर यांनी तो मंजूर केला. वैभव आणि वैभवी (नावे बदलली आहेत) असे दाम्पत्याचे नाव आहे. तो नोकरी करतो, तर ती गृहिणी आहे. 2009 मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहाच्या चार महिन्यांच्या संसारानंतर ती निघून गेली.

त्यानंतर चार वर्षांच्या कालावधीत ती ये-जा करत होती. 2013 नंतर वैभवी परत न आल्याने वैभव यांनी 2015 मध्ये वकिलांमार्फत तिला नांदायला येण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, ती आलीच नाही. अखेर त्याने अ‍ॅड. शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथे धाव घेतली. तिने नांदायला येण्याबाबतची मागणी केली. मात्र, ती न्यायालयातही हजर राहिली नाही. जून 2018 मध्ये न्यायालयाने तिला एका महिन्याच्या आत नांदायला येण्याचा आदेश दिला. मात्र, ती आलीच नाही.

पुणे : रिक्षा परमिट देणे आता बस्स; रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

तिने नांदायला येण्याच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून 18 जानेवारी 2020 रोजी वैभव याने घटस्फोटासाठी अ‍ॅड. शिवाजीराव देशमुख व अ‍ॅड. सई देशमुख यांच्यामार्फत अर्ज केला. तसेच अ‍ॅड. धैर्यशील गायके यांनीही काम पाहिले आहे. त्यानंतरही ती हजर झालीच नाही. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने न्यायालयीन कामकाजावर निर्बंध आले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. गिरडकर यांनी दोघांचा घटस्फोट मंजूर केला.

Back to top button