चिंचवड गावातील नवीन फुटपाथना खोदकामाचं ग्रहण | पुढारी

चिंचवड गावातील नवीन फुटपाथना खोदकामाचं ग्रहण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

चिंचवडगावातील बसस्थानक चौकात नव्याने बनविण्यात आलेले पदपथ पुन्हा उखडण्यात आले आहेत. त्यामुळे येथून जाताना पादचार्‍यांना अडथळा होत असून, नवीन पदपथ उखडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चिंचवडगावामध्ये वर्षभर सुरू असणार्‍या खोदकामामुळे नागरिक जेरीस आले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

तीन ते चार महिन्यांपूर्वी संपूर्ण चिंचवडगाव ते लिंकरोड सुसज्ज असे अर्बन स्ट्रिट पदपथ बसविण्यात आले आहेत. मात्र, सतत ड्रेनेज लाईन, गॅसवाहिनी आदींच्या कामामुळे हे पदपथ उखडल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या वर्षी मेट्रोच्या विद्युत वाहिनीसाठी संपूर्ण चिंचवडगावातील रस्ता खोदण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय -ड्रॅगनच्या भयछायेत…… 

त्यावेळी नागरिक व वाहनचालकांना रस्त्यावरुन जाताना कसरत करावी लागत होती. आता कुठेतरी सुसज्ज असे पदपथ बनविले असताना सतत कुठे ना कुठे तरी खोदकामाचे ग्रहण लागत आहे. नुकतेच आठ दिवसांपूर्वी चिंचवड गावातील बसस्थानक चौकात नव्याने पदपथ बनविण्यात आला होता. तोपर्यंत रस्ता पाण्याच्या व्हॉल्वसाठी खोदण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च करुन हे पदपथ बनविलेले असताना पुन्हा खोदकाम करुन नागरिकांच्या पैशाचा अपव्यय केला जात आहे, याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

निखतचा गोल्डन पंच!

Back to top button