वेध परीक्षांचे ! आतापर्यंत जमा झाले पावणेदोन लाख अर्ज | पुढारी

वेध परीक्षांचे ! आतापर्यंत जमा झाले पावणेदोन लाख अर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत 1 लाख 77 हजार 980 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची आघाडी आहे.
पुणे विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नसून, परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच घेण्यात येणार आहे.

सावधान! आता बालकामगार ठेवणार्‍यांकडून होणार जबर दंडाची आकारणी

नागपूर विद्यापीठाने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षाही घेतल्या जाव्यात, अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा कोरोनापूर्वी ज्या पद्धतीने व्हायच्या, त्याच पद्धतीने होणार आहेत. परीक्षेला आता एक महिन्याचाच कालावधी उरला आहे.

नाशिकच्या नांदगाव मध्ये तब्बल 10 मोर मृतावस्थेत आढळले, वनविभागात खळबळ

परंतु, अद्यापही विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भात प्रतिसाद दिसत नाही. तसेच महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अडवून ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे.

परीक्षा अर्जांची अडवणूक नको…

अभियांत्रिकी, फार्मसी आणि विज्ञान शाखेच्या तब्बल 58 हजार 241 विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयांनी आवक नोंद (इनवर्ड) न करता अडवून ठेवले आहेत. महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्कापैकी काही शुल्क जरी भरले नसले, तरी विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज ‘इनवर्ड’ करावा.

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यात 27 शाळा अनधिकृत; तुमची मुलं तर नाहीत ना या शाळांमध्ये, जाणून घ्या एका क्लीकवर

आर्थिक व इतर कारणांमुळे परीक्षेकरिता पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

दाखल परीक्षा अर्ज
आतापर्यंत भरलेले अर्ज :
1 लाख 77 हजार 980
महाविद्यालयांनी इनवर्ड केलेले अर्ज :
1 लाख 19 हजार 739
महाविद्यालयांकडून इनवर्ड करणे बाकी असलेले अर्ज : 58 हजार 241

Back to top button