

पुणे : पुढारी वृत्तसेवा
मेट्रोच्या कामानिमित्त येरवडा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या वेळी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन श्रीरामे यांनी केले आहे.
सिव्हील कोर्ट ते रामवाडी मेट्रोच्या रिच 3 या मार्गेकेवर एन. एम. चव्हाण चौक ते गोल्ड अॅडलॅब चौक दरम्यान महामेट्रो रेल्वेस्थानकाचे काम सुरू आहे. तसेच अॅडलॅब चौकात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 मे ते 26 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.