पुणे- मुंबई ‘एक्सप्रेस वे’ वर अपघाताला आमंत्रण : गावकर्‍यांनी तोडून टाकले क्रॅश बॅरिअर | पुढारी

पुणे- मुंबई 'एक्सप्रेस वे' वर अपघाताला आमंत्रण : गावकर्‍यांनी तोडून टाकले क्रॅश बॅरिअर

प्रसाद जगताप

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी क्रॅश बॅरिअर तोडून स्थानिक गावकरी महामार्गावर सर्रासपणे ये-जा करीत आहेत. त्यामुळे ताशी 80 ते 100 च्या स्पीडने जाणार्‍या वाहनांचे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

MonkeyPox चा कम्युनिटी स्प्रेड! युरोपसह २० देशांत रुग्णसंख्येत वाढ, WHO नं दिला इशारा

महामार्गाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही बाजूने लोखंडी क्रॅश बॅरिअर बसविण्यात आले आहेत. हे बॅरिअर वाहनांचे होणारे मोठे अपघात टाळणे आणि आजूबाजूने जाणार्‍या नागरिकांची घुसखोरी रोखण्याचे काम करतात. मात्र, महामार्गालगत राहणार्‍या नागरिकांनी ठिकठिकाणी हे बॅरिअर तोडून ये-जा करण्यासाठी रस्ते तयार केले आहेत. या रस्त्यांनी दुचाकीस्वार, तीनचाकी वाहनचालक सर्रासपणे महामार्गावर प्रवेश करीत आहेत.

हल्ला करणारा बिबट्या जेरबंद; मलठण येथे वन विभागाच्या पिंजर्‍यात झाला कैद

अशा रस्त्यावरून स्थानिक गावकर्‍यांची जनावरेदेखील महामार्गावर येत आहेत. त्यामुळेसुध्दा अपघात होण्याची शक्यता आहे. शनिवारी यासंदर्भात दै. ‘पुढारी’कडून महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्या वेळी स्थानिक गावकर्‍यांनी ये-जा करण्यासाठी क्रॅश बॅरिअर तोडून तयार केलेले रस्ते पाहायला मिळाले. (क्रमशः)

नगर : सामुदायिक विवाह सोहळ्यात १७ जोडपी विवाहबद्ध

महामार्गावर इथे तोडले ‘क्रॅश बॅरिअर’

पुणे-मुंबई महामार्गावर गहुंजे गाव परिसरात गावकर्‍यांनी अनेक ठिकाणी ‘क्रॅश बॅरिअर’ तोडले आहेत. तेथून पुढे तळेगाव टोल नाक्यापुढे डाव्या बाजूला हे बॅरिअर तोडण्यात आलेले आहेत. असे कट प्रत्येक गाव, वस्तीसमोरील बाजूला पाहायला मिळत आहेत. या तोडलेल्या ठिकाणांहून गावकरी आपली वाहने घेऊन महामार्गावर बिनदिक्कत प्रवेश करीत आहेत. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे.

‘क्रॅश बॅरिअर’चा नेमका फायदा काय?

महामार्गावर गाडी चालविताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. गाडीच्या अतिवेगामुळे गाडी मार्ग सोडून रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता असते. अशा वेळी कितीही वेगात गाडी असली, तरी क्रॅश बॅरिअर गाडीचा वेग रोखून गाडी रस्त्याच्या खाली जाण्यापासून रोखते.

गावकर्‍यांनी ज्या ठिकाणी क्रॅश बॅरिअर तोडले आहेत, ते आयआरबी आणि लोकल पोलिसांच्या मदतीने तत्काळ बसविण्यात येतील. तसेच, क्रॅश बॅरिअर तोडून महामार्गावर घुसखोरी करणार्‍यांवर कारवाईदेखील करण्यात येईल.

                                                              – संजय जाधव, पोलिस अधीक्षक, महामार्ग

Back to top button