पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरोदर पत्नीला मद्यपीची मारहाण | पुढारी

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरोदर पत्नीला मद्यपीची मारहाण

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मद्यपी पतीने गरोदर पत्नीला बेदम मारहाण केली. ज्यामुळे पत्नी आणि तिच्या पोटातील बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाला. ही घटना बुधवारी (दि.25) रात्री साडेबारा वाजता म्हातोबानगर झोपडपट्टी – वाकड येथे घडली.
राजेंद्र काशिनाथ वाडघरे (32, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पत्नीकडे पैसे नसल्याने तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून राजेंद्र याने पत्नीला शिवीगाळ करून केसांना धरून दरवाज्याकडे ओढत नेले. पत्नीच्या कमरेत जोरात लाथ मारली. तसेच, जमिनीवर कोसळल्याने फिर्यादी आणि त्यांच्या पोटातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल हे माहिती असताना आरोपीने त्यांच्या कमरेत लाथ मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button