पुणे : अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई | पुढारी

पुणे : अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

तळवडे (पुणे), पुढारी वृत्‍तसेवा : थरमॅक्स चौक ते दुर्गानगर चौक मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. दुर्गा नगर चौक ते थरमॅक्स चौक रस्त्याच्या दोन्ही बाजुला अनेक वर्षापासून नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले होते, अखेर गुरूवारी (दि.26) प्रशासनाने हा रस्ता अतिक्रमण मुक्त केला.

सदर कारवाईमध्ये 67250 चौ.फू. महापालिकेच्या जागेत व बीआरटी रस्त्यावरील असलेले अतिक्रमण हटवण्यात आले, यामध्ये रस्त्यावरील हॉटेल, छोटी दुकाने, आदी हटवण्यात आली आहेत. सदर कारवाई महापालीकेचे आयूक्त राजेश पाटील व अतिरीक्त आयुक्त यांच्या आदेशानूसार फ क्षेत्रीय विभागाने केली आहे. या वेळी अ, ब, क व ई प्रभागाचे संयूक्त अतिक्रमण पथक, बीट निरीक्षक, सुरक्षेच्या कारणास्तव 5 पोलीस निरीक्षक, 100 पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 125 जवान, तीन जेसीबी, एक पोकलेन मशीन, एक क्रेन आदी यंत्र व मनुष्य बळाचा वापर करून कारवाई पार पाडण्यात आली.

हेही वाचा  

Back to top button