आरसीबीच्या रजत पाटीदारने आयपीएल खेळण्यासाठी लग्न ढकलले पुढे | पुढारी

आरसीबीच्या रजत पाटीदारने आयपीएल खेळण्यासाठी लग्न ढकलले पुढे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज रजद पाटीदारने लखनौ विरूद्धच्या एलिमिनेटर सामन्यात ५४ चेंडूमध्ये ११२ धावांची दमदार शतकी खेळी केली. या दमदार शतकी खेळीच्या सर्वत्र चर्चा होत असतानाच रजत पाटीदार बाबत मोठी बातमी समोर आली आहे. रजतने आपले लग्न पुढे ढकलून आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीच्या संघात सहभागी झाला आहे.

आरसीबीकडून दमदार शतकी खेळी करणारा रजत पाटीदार हा २८ वर्षांचा आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने मध्यप्रदेशमध्ये होणारे आपले लग्न पुढे ढकलले आहे. रजतचे लग्न मे महिन्यात होणार होते, पण आरसीबीकडून कॉल आल्यानंतर ते पुढे ढकलण्यात आले, असे रजत पाटीदारचे वडिल मनोहर पाटीदार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. रजतचे लग्न आता जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या ऑक्शनमध्ये मध्यप्रदेशचा आक्रमक फलंदाज रजत पाटीदारची बेस प्राइज फक्त २० लाख होती. तरीही कोणत्याही संघाने रजतला आपल्या संघात घेण्यासाठी बोली लावली नाही. आरसीबीनेही संघात रजतचा समावेश केला नव्हता. आरसीबीचा खेळाडू लवनीथ सिसोदीया जखमी झाल्यानंतर त्याच्याजागी रजत पाटीदारला संधी देण्यात आली. २०२१ मध्ये रजत हा आरसीबीच्याच संघाचा भाग होता.

हेही वाचलंत का?

Back to top button