जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल | पुढारी

जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अकरा शाळांची प्रमाणपत्रे खोटी व बनावट आहेत हे माहिती असताना ती खरी असल्यासचे भासवून शाळांच्या मुख्याध्यापकांक्षारे 25 टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे शुल्क प्रतिपुर्ती मिळविण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांना ऑनलाईन सादर केले. ही फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग यांच्यासह चार जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा जोग, समग्र शिक्षा अभियानाचे वरीष्ठ सहाय्यक गौतम शेवडे, सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी किशोर पवार, मनरेगा विभागातील वरिष्ठ सहाय्यक हेमंत सावळकर यांच्यावर भादवि कलम 420, 464, 465, 466, 468, 470, 471, 201, 120 ब, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किसन दत्तोबा भुजबळ (रा. अनंत अपार्टमेंन्ट,शिवराज चौक, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींनी पुर्व नियोजीत कट करून आपआपसात संगनमत करून जोग एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या अकरा शाळांची 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या तीन वर्षाच्या कालावधीसाठीची खोटी व बनावट स्व-मान्यता प्रमाणपत्रे तयार केली. त्यावर संशयीत आरोपींनी खोट्या सह्या करून जावक क्रमांक नोंद करून सदर स्वमान्यता प्रमाणपत्रे ही बनावट व खोटी आहेत हे माहीत असतानाही ती खरी असल्याची भासवली.

या शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी ती बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक यांच्याकडे सादर केली. तसेच अकरा शाळांच्या मुख्याध्यापकांद्वारे 25 टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे शुक्ल प्रतिपुर्ती मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकार्‍यांनी ती सादर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button