पुणे : पैसे देण्यास नकार दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून | पुढारी

पुणे : पैसे देण्यास नकार दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून

पुणे, पुढारी वृत्तसेवा : मद्यप्राशन केल्यानंतर झालेल्या वादतून दोघांनी मित्राचा चाकूने गळा कापून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.24) जुनी जिल्हा परिषद समोरील फुटपाथवर उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रभातकुमार कमलाकर म्हस्के (वय.36,रा. सोलापूर), निलेश बाळासाहेब भोसले (वय.25,रा, वेल्हे, शिवापूर) यांच्यावर यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. तर संजय असे खून झालेल्या व्यक्‍तिचे नाव आहे. हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघे मिळेल ती कामे करून फुटपाथवर राहतात. सोमवारी प्रभातकुमार याला केटरींगच्या कामाचे 1600 रुपये मिळाले होते. तिघांनी एकत्र येऊन रात्री दहा वाजता मद्यप्राशन केले. तिघे रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. संजय याने प्रभातकुमार याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र पैसे संपल्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातून दोघांनी संजयचा चाकूने गळा कापला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मृत व्यक्ती व दोघे आरोपी एकत्र जात असल्याचे दिसून आले. त्‍यानंतर दोघांना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी चाकूने गळा कापून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button