पिंपरी : कोंबडीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : कोंबडीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोंबडीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मे २०२१ रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये अल्पवयीन मुलाने एका हातात कोंबडी पकडून अश्लील कृत्य केल्याचे दिसून येत होते. व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. अधिक चौकशीत आरोपी पिंपरी येथे राहत असल्याची माहिती समोर आली. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक आर. पी. बोबडे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button